
पुणे : पुणे महापालिकेला निवडणुकीच्या संदर्भात अद्याप राज्य शासन किंवा राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. पण निवडणुकीची तयारी करण्यासाठी आत्तापासून प्रशासनाने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महापालिका निवडणुकीमध्ये कर्मचारी, मतदान यंत्र, मतदान केंद्रांची संख्या दीडपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन जागा शोधणे, त्यासाठीचे आवश्यक साहित्य उपलब्ध करणे आदी गोष्टींची जुळवाजुळव करण्यासाठी महापालिकेत आज पहिली बैठक पार पडली.