

Pune Municipal corporation election
पुणे - निवडणूक प्रचारासाठी सभा किंवा कोपरा सभा घेताना महापालिकेचे मैदान अथवा अन्य जागेचा वापर केल्यास उमेदवार किंवा राजकीय पक्षांना शुल्क मोजावे लागणार आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार चौक सभेसाठी १८ हजार; तर कोपरा सभेसाठी सात हजार २०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे. विनापरवानगी सभा घेतल्यास दीड पट दंडासह रक्कम वसूल केली जाणार आहे.