PMC News Sakal
पुणे
PMC News : पीएमपी बसथांब्यावर प्रवाशांची परवड; वारज्यातील गार्डन सिटी सोसायटीसमोरील स्थिती; चिखल, खड्डे, राडारोड्याचा विळखा
Garden City Bus Stop : वारजेतील गार्डन सिटी बसथांबा चिखल, खड्डे आणि राडारोड्यामुळे धोकादायक स्थितीत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वारजे : गार्डन सिटी सोसायटीसमोरील बसथांब्याची पावसाळ्यात झालेली दुरवस्था प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. सद्य:स्थितीत या बसथांब्यासमोर चिखल, खड्डे आणि राडारोडा साचल्याने प्रवाशांना बसथांब्यापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे येथे बसथांबा असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.