
पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे आगमन शुक्रवारी (ता. २०) पुणे शहरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण शहरात वैद्यकीय उपचार, स्वच्छता आणि जनजागृती करण्यात येत आहे.