
पुणे : महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मंगळवारी (ता. ८) अचानक वारजे परिसरात भेट दिली. त्यावेळी त्यांना भररस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसले, रस्तेही झाडलेले नव्हते. त्यामुळे प्रशासनाच्या कामाची पुन्हा एकदा पोलखोल झाली. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फोन करून विचारणा केल्यानंतर खळबळ उडाली अन् स्वच्छतेसाठी कर्मचारी सरसावले.