#PMCIssue दुकाने थाटली नोंदीविना

दिलीप कुऱ्हाडे 
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

येरवडा - शहरातील अनेक लॉज, मंगल कार्यालये, ब्युटी पार्लर, सलून, रसवंतिगृहे, आइस फ्रूट, पान टपरी असो की अंडी विक्रेते यांची नोंदच महापालिकेच्या आरोग्य विभागात नाही. अशा नोंदणीची एकूण संख्या केवळ १९०० इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असून, त्याचे गांभीर्य ना लोकप्रतिनिधींना आहे ना प्रशासनाला! 

आरोग्य विभागात शहरातील लॉज, मंगल कार्यालय, सलून, पान टपरी, अंडी विक्रेता यांची नोंद करणे बंधनकारक आहे. महापालिका लॉजसाठी दरवर्षी चार हजार आठशे रुपये, तर मंगल कार्यालयासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारते. तसेच ब्युटी पार्लरच्या प्रति खुर्ची चारशे रुपये, सलूनच्या प्रति खुर्ची पन्नास रुपये, पान टपरी व अंडी विक्रेत्यांकडून ऐंशी रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते. मात्र अनेकांची महापालिकेत नोंदच केली नाही.

शुल्क चौदा वर्षांपूर्वीचे
शहरातील लॉज, मंगल कार्यालय, सलून, ब्युटी पार्लर, पान टपरी यांना आकारण्यात येणारे शुल्क हे २००४ पासूनचे आहेत. यामध्ये गेल्या चौदा वर्षांत एकदाही वाढ झाली नाही. भविष्यात दरवर्षी दहा टक्के दराने ही वाढ करण्याचा ठराव करण्यात येणार असल्याचा विचार आरोग्य विभागाचा आहे. 

शहरात लॉज, मंगल कार्यालये, सलून, ब्युटी पार्लर, पान टपरी, रसवंतिगृहे आदीची नोंदणीकृत संख्या १९०० आहे. पुणे शहराचा विचार करता ही संख्या अधिक असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे विशेष अभियान घेऊन सर्व लॉज, मंगल कार्यालयांसह सर्व दुकानांची नोंदणी करण्यात येणार आहे.
- डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य प्रमुख, महानगरपालिका

Web Title: PMC Issue Shop Without Registration Municipal