महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्‍टरांची रिक्त पदे भरणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांत कनिष्ठ डॉक्‍टरांची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे - महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांत कनिष्ठ डॉक्‍टरांची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, वरिष्ठ डॉक्‍टरांचा पगारही वाढविण्यात येणार आहे. महापालिकेने आरोग्यसेवा सुधारण्याच्या दृष्टीने ही पावले उचलली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या निर्णयानुसार नव्या 57 "एमबीबीएस' डॉक्‍टरांची नेमणूक होणार आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांचा पगार 52 हजारांवरून 71 हजार 697 इतका होणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. 

शहरात महापालिकेची 72 रुग्णालये आणि दवाखाने आहेत. मात्र, अपुऱ्या डॉक्‍टरांमुळे रुग्णांना सेवा पुरविणे शक्‍य होत नाही. वर्षानुवर्षे ही पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणा विस्तारण्यात अडचणी होत्या. 

भटक्‍या आणि मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या नायडू हॉस्पिटलजवळील नसबंदी आणि लसीकरण केंद्राची क्षमता वाढव्विण्याचा ठराव मंजूर झाला. त्यामुळे केंद्रात सुमारे चारशे कुत्री ठेवणे शक्‍य होणार आहे. सध्या या ठिकाणी दोनशे कुत्री ठेवण्याची क्षमता आहे. हे केंद्र जुने झाल्याने ते पाडून नवे बांधले जाणार आहे. त्यासाठी 4 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Municipal Hospital vacancies of doctors

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: