Water Worship as Khadakwasla Dam 100 percent Capacity Celebrating Punes Lifeline
sakal
खडकवासला - एल निनोचे सावट जूनअखेरपर्यंत मान्सूनने ओढ दिल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे सावट होते. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरले. परिणामी यंदाच्या जलपूजन सोहळ्याला विशेष महत्त्व होते.
पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या खडकवासला धरणसाखळीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे आमदार भीमराव तापकीर, महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते जलदेवतेचे पूजन करण्यात आले.