pune grand tour cycle competition
sakal
पुणे - रस्ते अरुंद होत आहेत म्हणून शहरातील पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक काढून टाकून वाहनांना वाट मोकळी करून देण्याचे नियोजन केले होते. आता शहरात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होत आहे, त्यानिमित्ताने ७५ किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक नव्याने तयार करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. पण सध्याच्या सायकल ट्रॅकची स्थिती कधी सुधारणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.