
पुणे : महापालिकेने भिलारेवाडी येथील तलावातून परिसरातील भागाला पाणीपुरवठा करणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू केली आहे. त्याच वेळी आता जांभूळवाडी तलावातूनही परिसरातील सुमारे ३५ हजार लोकसंख्येला वर्षभर पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यासाठीचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. या योजनेसाठी सुमारे ४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.