
पुणे : महापालिकेने कळस व बोपोडी येथे पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. स्वच्छता, वैद्यकीय उपचार, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा याकडे लक्ष दिले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. तसेच सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, मंडळे, व्यापारी संघटनांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.