

Tech Enforcement: Drone Matrix Exposes Massive Property Tax Evasion in Pune
ESakal
पुणे : शहरात चार लाखांहून जास्त मिळकतींना कर न लागल्याने तसेच वापरात बदल करूनही नोंद न झाल्याने महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. अशा मिळकतींचा शोध घेण्यावर मिळकतकर विभागाला मर्यादा येत असताना महाप्रित संस्थेच्या थ्रीडी ट्विन ड्रोन सर्वेक्षणातून करबुडव्या मिळकती सहज शोधता येत असल्याचे समोर आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या सर्वेक्षणात केवळ ९० मिळकतींमधून सुमारे ७५ कोटी रुपयांचे उत्पन्न वाढू शकते, असे स्पष्ट झाले आहे. मात्र महाप्रितने मागितलेल्या मोबदल्यावर तोडगा न निघाल्याने हा प्रस्ताव सध्या रखडला आहे.