Illegal Road digging
sakal
पुणे - सुसगाव येथे विनापरवाना रस्ते खोदाई केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या पथ विभागाने बांधकाम व्यावसायिकाला सहा कोटी ४३ लाख ७३ हजार ७६० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापूर्वीही याच व्यावसायिकाला ९५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे ही दंडाची रक्कम त्वरित वसूल करावी अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेने केली आहे.