पुणे - पावसाळ्यात शहरातील रस्त्याची चाळण होतेच पण पुढे वर्षभरही रस्त्यांना अनेक ठिकणी खड्डे पडलेले असतात. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होतात. पण नागरिकांना तक्रारी करता येत नाहीत. त्यामुळे आता नागरिकांना थेट तक्रार करता यावी साठी ‘पीएमसी रोड मित्र’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे.