
पुणे : वडगाव खुर्द ते राजाराम पुलादरम्यानच्या परिसराला पुराचा फटका बसू नये, तसेच नदीकिनारा सुशोभित करता यावा, यासाठी नदीसुधारच्या कामासाठी ३०० कोटी रुपयांची मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. आपत्ती व्यवस्थापनमधून निधी उपलब्ध करून द्यावा, या बाबतचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविला आहे.