
पुणे : शहरातील प्रमुख विकासकामांना गती देण्यासाठी, त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने आता ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे. त्यावर आयुक्त नवलकिशोर राम यांचे थेट नियंत्रण असणार आहे. जायका प्रकल्प, नदीकाठ विकास, समान पाणीपुरवठा योजना, कात्रज - कोंढवा व शिवणे - खराडी रस्ते विस्तार तसेच विविध उड्डाणपूल यांसारख्या सुमारे ३० प्रकल्पांचा यात समावेश आहे.