Pune News: विकासकामांना गती देण्यासाठी पुणे महापालिकेची ‘वॉर रूम’; आयुक्तांचे थेट नियंत्रण असणार
Pune development: पुणे महापालिकेच्या ३० पेक्षा अधिक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ‘वॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्त नवलकिशोर राम थेट देखरेख करणार आहेत. रस्ते, उड्डाणपूल, जलयोजना, नदीकाठ विकास यांसारख्या रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे.
पुणे : शहरातील प्रमुख विकासकामांना गती देण्यासाठी, त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने आता ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे. त्यावर आयुक्त नवलकिशोर राम यांचे थेट नियंत्रण असणार आहे.