

Road Potholes
Sakal
पुणे - मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता पुणे महापालिकेनेही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या किंवा मृत्यू होणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी महापालिकेकडून एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. संबंधित समितीद्वारे त्यांच्याकडे आलेल्या अर्जांची पडताळणी करून अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला जाणार आहे.