
पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या नियोजनात्मक विकासाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक गावाचा प्राथमिक नियोजन आराखडा तयार केला जाणार आहे, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी सांगितले. तसेच समाविष्ट गावांसाठी अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या निधीचे वर्गीकरण केले जाणार नसल्याचे आश्वासनही त्यांनी ग्रामस्थांना दिले.