
पुणे : कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी दुर्गंधी टाळण्यासाठी औषध फवारणी करण्याकरिता महापालिका पाच वर्षांत तब्बल ४९ कोटी ६३ लाख रुपये मोजणार आहे. त्यापैकी २१ कोटी ८३ लाख १५ हजार ६२५ रुपयांचा खर्च कल्चर पावडरसाठी होणार असल्याचे ठेकेदाराने दाखविले आहे. त्या तुलनेत महापालिका गेल्या काही वर्षांपासून वापरत असलेल्या कल्चर पावडरचा वापर स्वस्त ठरत आहे. त्यामुळे ठेकेदाराने प्रस्तावित केलेली पावडर वापरल्यास पाच वर्षांत ११ कोटी ५२ लाख ७६ हजार १२५ रुपये जादा मोजावे लागणार आहेत.