Pune Municipal Corporation : संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज पालखीचे पुणे महापालिकेकडून भावपूर्ण स्वागत
Wari 2025 : संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पुण्यात महापालिकेच्या वतीने आयुक्त व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण स्वागत करण्यात आले.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुणे महापालिकेच्या वतीने शुक्रवारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.