Abhay Yojana : अभय योजनेचा आज शेवटचा दिवस; पुणे पालिका तिजोरीत दोन महिन्यांत ६४५ कोटी जमा

पुणे महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेत मागील दोन महिन्यांत ६४५ कोटी रुपयांची थकबाकी झाली जमा.
PMC Property Tax Abhay Yojana

PMC Property Tax Abhay Yojana

Sakal

Updated on

पुणे - महापालिकेने मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेत मागील दोन महिन्यांत ६४५ कोटी रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. बुधवारी एका दिवसात सुमारे ७० कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. गुरुवारी (ता. १५) अभय योजनेचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर ही योजना बंद होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com