World Womens Day : पुण्यात १७ मार्गांवर पीएमपीमध्ये महिलांना शुक्रवारी मोफत प्रवास

जागतिक महिला दिनानिमित्त ‘पीएमपी’च्या महिला विशेष बसेसमधून १७ मार्गांवर धावणाऱ्या १७ बसमधून प्रवासी महिलांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये येत्या शुक्रवारी (ता. ८) मोफत प्रवास करता येणार आहे.
PMP Bus
PMP BusSakal

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त ‘पीएमपी’च्या महिला विशेष बसेसमधून १७ मार्गांवर धावणाऱ्या १७ बसमधून प्रवासी महिलांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये येत्या शुक्रवारी (ता. ८) मोफत प्रवास करता येणार आहे.

पुढे नमूद केलेल्या मार्गांवर शुक्रवारी सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत प्रवासी महिलांना करता येणार मोफत प्रवास.

१- ३०१ स्वारगेट ते हडपसर

२ -११७ स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर

३ - १६९ शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा

४ - ९४ कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन

५ - ८२ एनडीए गेट क्र.१० ते मनपा

६ - २४ कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड

७ - १०३ कात्रज ते कोथरूड डेपो

८ - ६४ हडपसर ते वारजे माळवाडी

९ - १११ भेकराईनगर ते मनपा

१० - १६७ हडपसर ते वाघोली

११ - १३ अप्पर डेपो ते शिवाजीनगर

१२ - ११ मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव

१३ - १७० पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द

१४ - ३२२ आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा

१५ - ३७२ निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी

१६ - ३६७ भोसरी ते निगडी

१७ - ३५५ चिखली ते डांगे चौक

शुक्रवारी विशेष सेवा

महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता. ८ मार्च) पीएमपीतर्फे विशेष बससेवा प्रवाशांसाठी आयोजित करण्यात आली आहे. पहाटे साडेपाच वाजल्यापासून नमूद केलेल्या मार्गांवर बससेवा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या गर्दीनुसार बसचे नियोजन कऱण्यात येत असून सरासरी १५ ते २० मिनिटांनी या बस उपलब्ध असतील, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी नमूद केले.

१- कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटा पर्यंत)

२ स्वारगेट मुख्य स्थानक ते निळकंठेश्वर (रूळेगांव)

३ निगडी (पवळे चौक) निगडी (पवळे चौक) घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com