पीएमपीच्या बसचा उद्यापासून लिलाव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पुणे - आयुर्मान संपलेल्या पीएमपीच्या १६४ बसचा बुधवारी (ता. २२) आणि गुरुवारी (ता. २३) ऑनलाइन पद्धतीने लिलाव होणार आहे. हा लिलाव खुला आहे. बसबरोबरच अनेक सुट्या भागांचाही लिलाव होईल, असे पीएमपी प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुकांनी ९८२२०८७०१० किंवा ९६७३९१११०९ या मोबाईलवर संपर्क साधावा. तसेच, लिलावाबद्दलचे अधिक तपशील पीएमपीच्या भांडार विभागात उपलब्ध आहेत, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त व्यावसायिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus auction from tomorrow