पुण्यात पीएमपी बंदविरोधात भाजप आक्रमक; स्वारगेट डेपोसमोर आंदोलन

PMP bus Closed for 7 days BJP Protest in front of swargate depot
PMP bus Closed for 7 days BJP Protest in front of swargate depot

पुणे :  पीएमपीएल बस सेवा बंद केल्याने पुणेकरांची गैरसोय  होत असून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट पीएमपीएल डेपोसमोर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे शहरध्यक्ष जगदीश मुळीक येथे उपस्थित होते. दरम्यान, ''बस सुरूच केल्या पाहिजेत, शहराची आर्थिक घडी विस्कटली आहे. योग्य काळजी घेऊन बस सुरू ठेवणे शक्य आहे. सत्ता आहे म्हणून मनमानी नको. राज्य सरकारला मदत करू. पण पोलिसांनी ही संयम बाळगला पाहिजे. शहराला खड्ड्यात घालू नका तातडीने बस सुरू करा अशी मागणी खासदार गिरीश बापट यावेळी केली. तसेच, ''उद्यापासून बस थांब्यावर नगरसेवक आंदोलन करणार आहेत. सगळे नियम पाळून आंदोलन करू.'' असा इशारा देत संचारबंदी रद्द करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली. 
 

दरम्यान, पुण्यात भाजपची सत्ता असतानाही पीएमपीएल बंद करण्यात आली आहे, याबाबत विचारले असता गिरीश बापट म्हणाले, भाजपची सत्ता असली तरी सरकार तो निर्णय घेते. पीएमपीएल बस बंद ठेवण्याचा निर्णय   विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. 
रोग एक आणि त्याच्यावरचं निदान वेगळं. किमान ४० टक्के क्षमतेने बस सुरू ठेवण्याची गरज आहे. उद्योगधंद्यातील कर्मचारी कामावर न आल्यास उद्योगधंदे बंद पडतील.ऑफिसेस बंद पडतील, कारखाने बंद पडतील, मग आर्थिक घडी बिघडेल.''

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुणेकरांची गैरसोय पीएमपीची बससेवा बंद असल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ''आम्हाला सरकारला सहकार्य करायचे आहे, राजकारण करायचे नाही. चुकीच्या नियोजनाचा किती मोठा फटका बसतो याचा अनुभव घेतला आहे'' यावरुन सरकारने शहाणे व्हावे'' अशी खोचक प्रतिक्रिया बापट यांनी यावेळी दिली.

''उद्या शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजप आंदोलन करणार'' असल्याचा इशारा जगदिश मुळीक यांनीही यावेळी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com