रंग सांगणार पीएमपीचे 217 मार्ग; बसमध्ये क्‍यूआर कोडद्वारे प्रवाशांना मिळणार माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMP 217 route Information will get through qr code and the color to Passengers

पीएमपीचे बहुतेक मार्ग आता कलर कोडनुसार निश्‍चित करण्यात आले आहेत. दिवाळीपासून 90 दिवसांत पीएमपीचे प्रमुख थांबे, स्थानके आणि आगारांत त्याची माहिती नकाशांद्वारे प्रवाशांना मिळणार आहे. त्यासाठी फलक लावण्याचे काम शुक्रवापासून सुरू होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.

रंग सांगणार पीएमपीचे 217 मार्ग; बसमध्ये क्‍यूआर कोडद्वारे प्रवाशांना मिळणार माहिती

पुणे : मनपा- भोसरी मार्गावरील बस हवी, आता तपकीर रंगाचा बोर्ड पहा आणि प्रवास करा...हा रंग प्रवाशांना वेळापत्रक, पीएमपी केअर ऍपवरही दिसणार आहे. अशाच पद्धतीने शहरातील 207 मार्ग 15 रंगांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, बसमध्ये आणि चारही बाजूला लावण्यात आलेल्या क्‍यू-आर कोडच्या माध्यमातून बसचे सुरुवातीचे ठिकाण, शेवटचा थांबा आणि त्या मार्गावरील सर्व बस थांबे याचीही माहिती मोबाईलमध्ये मिळणार आहे.

पीएमपीचे बहुतेक मार्ग आता कलर कोडनुसार निश्‍चित करण्यात आले आहेत. दिवाळीपासून 90 दिवसांत पीएमपीचे प्रमुख थांबे, स्थानके आणि आगारांत त्याची माहिती नकाशांद्वारे प्रवाशांना मिळणार आहे. त्यासाठी फलक लावण्याचे काम शुक्रवापासून सुरू होणार आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली. या प्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे आदी उपस्थित होते. कलर आणि क्‍यूआर कोडचा बसच्या मार्गांचा वापर करणारी पीएमपी ही देशातील एकमेव परिवहन संस्था आहे. लंडन मेट्रोच्या धर्तीवर कलर कोडींग करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. करीस्मा (कलर कोडींग ऑल रूटस टू आयडेंटीफाय सिंपलीफाय मॅप अँड ऍप) तंर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

क्‍यूआरड कोड सांगणार माहिती
बसमध्ये आतील बाजूस दोन ठिकाणी तसेच बसच्या बाहेरील बाजूसही क्‍य-आर कोड लावण्यात येणार आहे. प्रवाशांनी त्यांच्या मोबाईलमधील स्कॅनरचा वापर करून क्‍यू-आरकोड स्कॅन केल्यावर त्यांना बसचे सुरुवातीचे ठिकाण, शेवटचा थांबा आणि त्या मार्गावरील सर्व बस थांबे याचीही माहिती त्यांच्या मोबाईल फोनमध्ये मिळणार आहे. त्यात पीएमपीच्या टोल क्रमांकाचाही समावेश असेल. या पूर्वी पीएमपीच्या बसला फक्त मार्ग क्रमांक होता. परंतु, नव्या प्रवाशांना थांब्यांची माहिती मिळत नव्हती. आता त्यासाठी कलर कोडींग आणि क्‍यूआर कोडचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.

शहरातील 2017 मार्गांना लाल, काळा, निळा, जांभळा, हिरवा, पारवा, गुलाबी, पोपटी, तपकिरी, आकाशी, पिवळा, शेवाळी, राखाडी, खाकी, मोरपंखी, केसरी, किरमीजी हे 15 रंग देण्यात आले आहेत. त्या- त्या रंगांचे स्टिकर्स बसवर लावण्यात येणार आहेत. डिझाईन्सच्या अभ्यासक्रमांचे काही विद्यार्थी, लोगोसाठी एज क्रिएशन्सचे योगेश रिसवाडकर, नकाशांसाठी "सस्टेनॅब्लिटी इनिशेटीव्ह' आदींनी सहकार्य केल्याचे जगताप यांनी सांगितले.

लोकलच्या धर्तीवर नकाशे
पीएमपीच्या प्रत्येक बसमध्ये लोकलच्या धर्तीवर पहिला स्टॉप, शेवटचा स्टॉप, एकूण बसथांबे आदींची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. एक महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांना थांब्यांबद्दलची माहिती मिळेल. तसेच पीएमपी केअर ऍपमध्ये कलर कोडचे मार्ग, नकाशे आदींचीही माहिती असेल. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभपणे करता येईल, असे पीएमपीच्या सहव्यवस्थापक केरूरे यांनी सांगितले.

loading image
go to top