देहूरोड, विकासनगरमधील प्रवाशांची कोंडी

देहूरोड, विकासनगरमधील प्रवाशांची कोंडी
Published on: 

पिंपरी, ता. ४ : पीएमपीची वडगाव मावळ ते कात्रज (बस मार्ग क्र. २२८) ही महत्त्वाची बस जुन्या मार्गावरून म्हणजेच देहूरोड बाजार आणि विकासनगर मार्गे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. याबाबत प्रवाशांनी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले आहे.
पूर्वी जेव्हा किवळे ग्रामपंचायत अस्तित्वात होती, तेव्हा ही २२८ क्रमांकाची बस देहूरोड बाजार, विकासनगर आणि शिंदे पेट्रोल पंप या लोकवस्तीतून मार्गस्थ होत असे. कात्रजला थेट जाण्यासाठी ही एकमेव सोयीची बस असल्याने प्रवाशांची गर्दी असायची. मात्र, काही वर्षांपूर्वी ‘रस्ता अरुंद आणि खराब आहे’ असे कारण पुढे करत प्रशासनाने या बसचा मार्ग अचानक बदलला. सध्या ही बस देहूरोड पोलिस ठाण्यामागील निर्जन भागातून पुढे नेली जाते. त्यामुळे या प्रवाशांना फायदा होत नाही. दुसरीकडे, देहूरोड बाजार आणि विकासनगर भागात लोकसंख्या वाढली असून, नागरिकांना कात्रजला जाण्यासाठी खासगी वाहनांचा किंवा इतर महागड्या पर्यायांचा अवलंब करावा लागत आहे.


देहूरोड आणि विकासनगर परिसरातील नागरिकांना थेट कात्रजला जाण्यासाठी ही बस उपयुक्त होती. पण, प्रशासनाने मार्ग बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने पाहून प्रवाशांच्या हितासाठी हा मार्ग पूर्ववत करावा.
- रवींद्र कदम, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com