दिलासादायक : पुण्यात आता पीएमपी बससेवा सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

या मार्गांचा प्रस्ताव
स्वारगेटवरून निगडी, कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, अप्पर इंदिरानगर, धायरी आणि हडपसर, महापालिका भवनवरून लोहगाव, म्हाळुंगे, बालेवाडी, पाषाण, बावधन, चिंचवडगाव, माळवाडी, कोथरूड, पुणे स्टेशनवरून हडपसर, वाघोली, विश्रांतवाडी, कोंढवा खुर्द, हडपसर ते खराडी बायपास आदी २० मार्गांवर बससेवा सुरू करता येईल. यासाठी स्वारगेट, नरवीर तानाजी वाडी, कोथरूड, कात्रज, मार्केटयार्ड, हडपसर, पुणे स्टेशन आणि बालेवाडी आगारांतील बस वापरता येतील. सुमारे १५ ते ३० मिनिटांच्या वारंवारितेनुसार या बस उपलब्ध करता येतील.

पुणे - पुणे शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ दरम्यान बससेवा सुरू करावी, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना सादर करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि शहराचा मध्य भाग सोडून उर्वरित शहरात सुमारे २० मार्गांवर ९५ बसच्या माध्यमातून बससेवा सुरू करता येईल, असे त्यात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात एक जूनपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली आहे. दुकाने, उद्याने काही प्रमाणात सुरू झाली आहेत. विमान आणि रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही पूर्ववत होत आहे. 

पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी

रिक्षा आणि कॅबलाही काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. सध्या खासगी वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या नागरिकांकडे खासगी वाहने नाहीत, विशेषतः कष्टकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. त्यांना कामावर जाण्यासही अडचण येऊ लागली आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र आणि मध्य भागातील पेठांचा भाग सोडून पीएमपीची सेवा ठराविक वेळेत सुरू करावी, असा प्रस्ताव पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक शंकर पवार यांनी दिला आहे.

आता टाटा स्काय, जिओव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे?

शहरातील प्रमुख रस्ते, उपनगरे येथे पीएमपीची शटल सेवा सुरू करता येईल. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात येऊ शकेल. बसमध्ये 
सध्या त्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे, असेही त्यात नमूद केले आहे. 

शहरातील बससेवा सुरू करण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना तर, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशी बससेवा सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना प्रस्ताव दिला आहे. शहरातील सर्वच वाहतूक सुरू झालेली असताना, पीएमपी बंद ठेवणे योग्य नाही. ज्यांच्याकडे स्वतःची वाहने नाहीत, अशा नागरिकांची गैरसोय होत आहे.
- शंकर पवार, संचालक, पीएमपी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus service will now start in Pune