पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांची बदली; नवे अध्यक्ष कोण?

टीम ई-सकाळ
Thursday, 16 January 2020

पुणे : पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांची आदिवासी कल्याण विभागात बदली. पीएमपीच्या अध्यक्षपदी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी यांची राज्य सरकारने नियुक्ती झाली आहे. सुमारे 2 वर्षे गुंडे पीएमपीच्या अध्यक्षपदी होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

राज्य सरकारने गुरुवारी 17 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात गुंडे यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यकाळात पीएमपीच्या 125 इ बस, 235 सिएनजीवरील मिडी बस दाखल झाल्या आहेत.  सिएनजी वरील 400 बसही पीएमपीच्या ताफ्यात येण्यास प्रारंभ झाला आहे.

गुंडे यांच्या काळात सुमारे 1400 कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत नुकतेच नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, पीएमपीच्या मालमत्तांना अडीच एफएसआय मिळविणे, आगरांचे विकसन आदी प्रकल्प अपुरे राहिले आहेत. गुंडे मूळच्या नागपूरच्या असून सुर्यवंशी हे पहिल्यांदाच वाहतूक विभाग सांभाळणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmp president naina gunde transfer dr. n v deshmukh new president