पीएमपी बंद पडण्याच्या मार्गावर!;पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून तरतुदींकडे दुर्लक्ष 

pmp-bus
pmp-bus

पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रवाशांसाठी बस सेवा देण्यासाठी पीएमपीकडे आता बस आहेत... पण, त्या चालविण्यासाठी दोन्ही महापालिकांकडून तरतूद उपलब्ध होत नसल्यामुळे पीएमपी आता बंद पडण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

पीएमपीची वाहतूक 18 मार्च ते 2 सप्टेंबर दरम्यान बंद होती. 3 सप्टेंबरपासून वाहतूक सुरू झाल्यावर प्रवासी संख्या आता 1 लाख 58 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे बसची संख्या वाढविण्याचाही पीएमपी प्रशासन विचार करीत आहे. परंतु, दोन्ही महापालिकांनी पीएमपीला आर्थिक मदत केली नाही तर, वाहतूक करणे पीएमपीला अवघड होणार आहे. पीएमपीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु, सुमारे पाच महिने पीएमपीची सेवा बंद असल्यामुळे या संस्थेचे आर्थिक कंबरडे अक्षरशः मोडले आहे. त्यातच सीएनजी इंधनाचे पैसे न मिळाल्यास त्याचा पुरवठा बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस निगम लिमिटेडने (एमएनजीएल) पीएमपीला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. 

या बाबत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले, ""पुरेसा निधी मिळावा आणि बस वाहतूक सुरू ठेवता यावी, यासाठी दोन्ही महापालिकेचे पदाधिकारी, आयुक्तांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढू असे आश्‍वासन दिले आहे. त्याबाबत सध्या पाठपुरावा सुरू आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे म्हणाले, ""पीएमपी ही सार्वजनिक वाहतूक आहे. तिची जबाबदारी कायद्यानेही दोन्ही महापालिकांवर आहे. प्रभाग स्तरावर सुरू असलेला फुटकळ खर्च तातडीने बंद केला पाहिजे.'' 

या बाबत महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ""पीएमपीला मदत करण्याची भूमिका आहे. परंतु, महापालिकेचीही आर्थिक स्थिती नाजूक आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिका काही योजनांवर काम करीत आहे. त्यातून पीएमपीला नक्कीच मदत करू.'' 

अशी आहे दोन्ही महापालिकेडे थकबाकी 
- पीएमपीला पुणे महापालिकेकडून 110 कोटी रुपये तर, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 73 मिळणे अपेक्षित. 
- लॉकडाउनच्या काळात पीएमपीने पुणे महापालिकेला 10 हजार 967 बस आणि 1937 कर्मचारी पुरविले होते. 
- त्या काळातील 35 कोटी 35 लाख 60 हजार रुपये महापालिकेने पीएमपीला देणे आहे. 
- पिंपरी चिंचवड महापालिकेला 3 हजार 64 बस आणि 1 हजार 113 कर्मचारी देण्यात आले होते. 
- त्याचे 13 कोटी 40 लाख 46 हजार रुपयांचे बिल पीएमपीला अद्याप देण्यात आलेले नाही. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मेट्रो तुपाशी, पीएमपी उपाशी ! 
दोन्ही शहरांत 32 किलोमीटरच्या मेट्रो मार्गांसाठी 11 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू आहे. त्यासाठी दोन्ही महापालिकांनी पुरेसा निधी दिला आहे. परंतु, एरवी सुमारे 11 लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या पीएमपीला सध्या वाहतूक सुरू ठेवणे निधीअभावी अवघड झाले आहे. पीएमपीच्या ताफ्यात गेल्या वर्षात सीएनजीवरील 860 तर 150 ई- बस दाखल झाल्या आहेत. आता त्यांची वाहतूक सुरू कशी ठेवायची, असा प्रश्‍न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com