प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपी १५० जादा बसेस वाढविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMP-Bus
प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपी १५० जादा बसेस वाढविणार

प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपी १५० जादा बसेस वाढविणार

पुणे - पीएमपी प्रशासनाने (PMP Administrative) प्रवाशांच्या सेवेसाठी (Passenger Service) लवकरच १५० जादा बसेस (Bus) रस्त्यांवर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या मार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे, अशा मार्गांवर फेऱ्यांची संख्या वाढविली जाणार आहे. ‘बस डे’ (Bus Day) व वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या तिकीट दरातील सवलतीतून प्रवाशांची संख्या व मिळणाऱ्या प्रतिसादावरून पीएमपीने हा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांच्या अपेक्षा, त्यांचा मिळणार प्रतिसाद लक्षात घेऊन पीएमपीच्या प्रवासी सेवेत आवश्यक तो बदल केला जाणार आहे. हा बदल करण्यापूर्वी आवश्यक तो डेटा उपलब्ध व्हावा, याहेतूने ‘बस डे’ला १८५३ गाड्या सोडण्यात आल्या. मंगळवारीही ‘पुण्यदशम’चा प्रवास मोफत ठेवला. शहर व पिंपरी चिंचवड क्षेत्रात तिकीट दर पाच रुपये व जास्तीचा तिकीट दर १० रुपये ठेवला. बस सेवेतील त्रुटी लक्षात आल्याने प्रशासनाने गाड्यांच्या संख्या वाढविण्याचा तसेच ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरु झाल्याने पीएमआरडीए क्षेत्रात फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी वर्धापन दिन असल्याने ‘पुण्यदशम’चा प्रवास मोफत होता तर पुणे व पिंपरी-चिंचवडचा रोजचा ५० रुपये देऊन करावा लागणारा प्रवास मंगळवारी १० रुपयांत झाला. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

‘बस डे’ला ११ लाख प्रवासी

सोमवारी ‘बस डे’ला सुमारे ११ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यातून पीएमपीला एका दिवसाचे उत्पन्न एक कोटी ६५ लाख ३७ हजार ४९८ रुपये इतके झाले. कोविडनंतरच्या काळातला हा सर्वांत जास्त आकडा आहे.

आम्हाला अपेक्षित असणारा डेटा प्राप्त झाला आहे. त्यानुसार विविध मार्गांवर बसच्या फेऱ्या वाढविल्या जातील. तसेच सुमारे १५० जादा बसेस घेण्याची गरज आहे. त्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल.

- डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Pmp Will Increase 150 Extra Buses For Passenger Service

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..