esakal | Pune : पीएमपी आता टाकणार कात
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML-BUS

पीएमपी प्रवासीकेंद्रित सुविधांसाठी पुणे विद्यापीठाशी करणार करार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपीमध्ये (pmpml) प्रवासीकेंद्रित सुविधा वाढविताना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत कशी घ्यावी, संशोधन कशा पद्धतीने करावे, पीएमपीकडील माहितीचे विश्लेषण कसे करावे, यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (pune univercity) आता पीएमपीला मदत करणार आहे. याबाबतच्या करारावर गुरुवारी (ता. २२) स्वाक्षरी करण्यात येणार आहे. (PMP will sign an agreement with Pune University for passenger-centric facilities)

पुणे शहर (pune city), पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) आणि जिल्ह्याच्या काही भागांत पीएमपीची वाहतूक सुरू आहे. कोरोनापूर्व काळात पीएमपीची प्रवासी संख्या सुमारे ११ लाख होती. सध्या सुमारे पाच लाखांवर प्रवासी संख्या पोचली आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस आहेत. या पार्श्वभूमीवर पीएमपीने धोरण आणि नियोजन तयार करण्यासाठी आता विद्यापीठाची मदत घेण्याचे ठरविले आहे, अशी माहिती पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे यांनी दिली.

हेही वाचा: नियोजन समितीवरील सदस्यांची नियुक्ती; आमदार, खासदारांसह तीस सदस्यांचा समावेश

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनीही त्यासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. वाहतूक मार्गांचे सुसूत्रीकरण, सुटे भाग व्यवस्थापन, प्रशासन, व्यवसाय वृद्धीचा आराखडा आदींमध्ये पीएमपीला भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी विद्यापीठातील कुशल मनुष्यबळाचा उपयोग पीएमपीला होणार आहे. तसेच काही समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विद्यापीठातील तज्ज्ञ, विद्यार्थी पीएमपीमध्येही येऊन काम करतील. वाहतूक कंपनी, शिक्षण आणि संशोधन यांची सांगड घालण्याच्या या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे केरूरे यांनी सांगितले. पीएमपीने यापूर्वी शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाशीही (सीओईपी) सहकार्याचा करार केला आहे.

पीएमपीला प्रवासीकेंद्रीत सुविधा वाढविण्यासाठी अनेक घटकांचे सहकार्य लागते. विद्यापीठाकडे त्यासाठी कुशल मनुष्यबळ आहे त्यांच्या कल्पना, संकल्पनांचा वापर पीएमपीच्या व्यवस्थापनात होऊ शकतो, हे लक्षात घेऊन हा करार करण्यात येत आहे.

- चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

loading image