
पुणेकरांच्या अडचणी वाढणार; PMPML बसेस 25 मार्चपासून होणार बंद?
पुणे : पुणे आणि पिंपर-चिंचवडमधील निम्या पीएमपीएल (PMPML) बसेस बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. थकबाकी न दिल्यास येत्या 25 मार्चपासून निम्म्या पीएमपीएल बसेस बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. (PMPML Bus Service May Be Hamper In City)
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज सुमारे तेराशे ते चौदाशे पीएमपीएलच्या बसेस धावतात. एवढेच नव्हे तर या शहर बसेसना शहराची लाईफलाईन (Public Transport) म्हणून देखील ओळखले जाते. परंतु, गेल्या 6 महिन्यांपासून ज्या ठेकेदारांकडून (Contractor) या बसेस शहरात चालवल्या जातात त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पीएमपीएलकडून पैसे देण्यात आलेले नाहीत. याबाबत संबंधित ठेकेदारांकडून प्रशासनाशी चर्चादेखील करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही थकीत पैसे देण्यात आलेले नाही.
त्यामुळे अखेर संबंधित ठेकेदारांकडून थकबाकी न दिल्यास 25 मार्चपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये धावणाऱ्या निम्म्या पीएमपीएल बसेस बंद करण्याचा इशारा संबंधित ठेकेदारांकडून पीएमपीएल प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी या बसेसवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसू शकतो. पीएमपीएल बसेसकडून प्रशासनाला अंदाजे दररोज 60 ते 70 लाखांचे उत्पन्न मिळते. दरम्यान, ठेकेदारांच्या या इशाऱ्यानंतर या प्रश्नावर कशाप्रकारे तोडगा काढला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Title: Pmpl Buses In Pune Pimpri Chinchwad Will Be Closed From March 25
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..