‘कोरेगाव भीमा’साठी ‘पीएमपी’कडून मोफत बससेवा | Free Bus Service | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMP Bus
‘कोरेगाव भीमा’साठी ‘पीएमपी’कडून मोफत बससेवा

‘कोरेगाव भीमा’साठी ‘पीएमपी’कडून मोफत बससेवा

कात्रज - पीएमपीएलकडून (PMPL) १ जानेवारीला विजयस्तंभ कोरेगाव भीमा येथे मानवंदना देण्यासाठी विशेष बससेवा (Special Bus Service) देण्यात येत आहे. कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील क्रांतिस्तंभाच्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी राज्यातून तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी तसेच येणारी वाढीव प्रवासीसंख्या विचारात घेऊन महामंडळाच्या वतीने ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२२ रोजी जादा आणि मोफत बसचे नियोजन केले आहे.

३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ पासून ते १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ६ पर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान येथून ३० बसेस, वढू फाटा ते वढू करिता ५ बसेस व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते भीमा कोरेगाव पर्यंत २५ बसेस, अशा एकूण ६० मोफत (विनातिकीट) बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच १ जानेवारी रोजी तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोल नाक्यापर्यंत १०० बसेस, शिक्रापूर रस्ता ते भीमा कोरेगावपर्यंत ७५ बसेस व वढू फाटा ते वढूपर्यंत २५ बसेस, अशा एकूण २०० मोफत (विनातिकीट) बसेसचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणाहून खालील स्थानकावरून प्रवास भाडे आकारणी करून कोरेगाव भीमासाठी काही जादा बसेसचे नियोजन केले आहे. या मार्गांवर सद्यःस्थितीत सुरू असलेल्या ३६ बसेस व्यतिरिक्त आणखी ३५ बसेस सोडणार असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Pmpl Free Bus Service For Koregaon Bhima

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..