PMPML Bus Accident : पीएमपीएमएल बसचे चाक पायावरून गेल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी

पीएमपीएमएल बस वळविताना विद्यार्थीनीच्या पायावरून चाक गेल्याची गंभीर घटना वाघोलीतील केसनंद फाटा बी आर टी बस स्थानकात घडली.
pmpml bus accident student injured wagholi brt bus stand
pmpml bus accident student injured wagholi brt bus standsakal

Wagholi News : पीएमपीएमएल बस वळविताना विद्यार्थीनीच्या पायावरून चाक गेल्याची गंभीर घटना वाघोलीतील केसनंद फाटा बी आर टी बस स्थानकात घडली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. या प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवी मिश्रा असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील जयचंद मिश्रा यांनी पोलीसात फिर्याद दिली. अजय कच्छवे या बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही जे एस पी एम महाविद्यालयात शिक्षण घेते. कॉलेज संपल्यानंतर ती बसने घरी जाण्यासाठी या स्थानकात आली.

बसच्या प्रतिक्षेत असताना स्थानकावर एक बस आली. चालक वळण घेत असताना तिला बसची धडक बसली व तिच्या पायावरून चाक गेले. ती यामध्ये गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. बस चालक हलगर्जीपणे बस चालवितात.

अनेक वेळा मागे पुढे असलेली वाहने ते पाहत नाही. केवळ त्यांचा पुढे निघण्याचा प्रयत्न असतो. यामध्ये अनेक वेळा किरकोळ अपघात होतात. बस चालकांना शिस्त लावण्याची गरज आहे. अशी नागरिकांचे मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com