PMPML Bus Fire : खडकवासला येथे पीएमपीएमएल बसला आग लागून खाक

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बसला आग लागून जळून झाली खाक.
PMPML Bus fire in Khadakwasala
PMPML Bus fire in Khadakwasalasakal
Updated on

खडकवासला - पुणे- पानशेत रस्त्यावर खडकवासला येथील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (डीआय‌एटी) येथील लष्करी तंत्रज्ञान संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बसला आग लागून जळून खाक झाली आहे. या बसमध्ये सुमारे वीस पंचवीस प्रवासी, चालक वाहक प्रवास करीत होते सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. डिझेलचा टाकी देखील सुरक्षित आहे.

खडकवासला येथील धरण येथील पहिली चौपाटी पासून पानशेत च्या बाजूला एक किलोमीटरवर ही घटना घडली. स्वारगेटवरून बस‌ एक वाजण्याच्या सुमारास (एमएच १२- केक्यू १८४४) खानापूरला निघाली होती. दीड पावणेदोन वाजण्याच्या सुमारास चालत्या बसला आग लागली.

गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी जागीच थांबवली. चालक वाहकांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरवल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. गाडीमध्ये साधारण 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते.

निघणाऱ्या धुराचे प्रमाण वाढले होते. प्रवासी उतरताच गाडीने एकदम पेट घेतला. चालक फिरोज शेख यांनी तत्काळ अग्निशमन दलाला बसला लागलेल्या आगीची घटना कळवली. पीएमआरडीएच्या नांदेड येथील अग्निशमन दलाचे‌ वाहन घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करीत होते. आग आटोक्यात आणण्यासाठी अर्धा तास गेला.

'पीएमआरडीए'च्या अग्निशमन दलाचे अग्निशमन विमोचक ज्ञानेश्वर बुधवंत, प्रोज्योत कोरडे आणि वाहन चालक प्रेमसागर राठोड यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मधील देखील अग्निशामक दलाची वाहन घटनास्थळी दाखल झाले.‌ त्यांनी देखील‌ आग आटोक्यात आणण्यास काम केले.

बस कुलिंग करण्यात आली. सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग विझवण्यात आली. त्यानंतर दोन्ही बाजूला थांबवण्यात आलेली रस्त्यावरील वाहतूक सोडण्यात आली.

जूनी‌ नादुरुस्त बस

ही बस पूर्वी पुणे दर्शन साठी वापरण्यात येत होती. या बसला मध्यभागी एकच दरवाजा आहे. डिझेलवर चालणारी ही बस आहे.‌ स्वारगेट वरून निघाल्यापासून बसचा वेग फार कमी होता. धायरी फाट्याच्या पुढे आल्यावर तो आणखीन कमी झाला. चौपाटी सोडल्यानंतर बसमधून धूर येऊ लागला. त्यानंतर बसने पेड घेतला. असाच प्रकार मागील वर्षी २४ मे २०२४ रोजी याच परिसरात बसला आग लागण्याची घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com