pmp-bussakal
पुणे
Heart Attack : पीएमपी चालकाला ह्रदयविकाराचा झटका; लक्ष्मी रस्त्यावरील घटना
लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात पीएमपी चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना सोमवारी घडली.
पुणे - लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात पीएमपी चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. चौकात वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी त्वरित चालकाला रुग्णालयात नेत त्याचे प्राण वाचवले.

