

PMPML Bus Accident
esakal
सिंहगड रस्ता : प्रवाशांच्या गर्दीमुळे धावत्या पीएमपी बसच्या पुढील दरवाजातून रस्त्यावर पडलेली तरुणी शेजारून जाणाऱ्या 'स्कूल बस'च्या चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील अप्पासाहेब मोरे चौकात, ब्रह्मा हॉटेलसमोर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कांचन खड्डा (वय २५, मूळ रा. राजस्थान) असे मृत तरुणीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.