

PMPML CCTV Surveillance Security Upgrade Across Bus Depots and Stations
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस स्थानक आणि आगारांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर प्रशासनाने त्याबाबत उपाययोजना सुरू केल्या आहेत. पीएमपीएमएलच्या ३ स्थानकांत आणि १२ आगारांमध्ये एकूण २३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तर उर्वरित सात स्थानके आणि पाच आगारांमध्ये टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. मार्च २०२७ पर्यंत सर्व आगारांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.