
पुणे : प्रवाशांची सोय व्हावी व ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढावे यासाठी दुपारच्या सत्रातील बसच्या वाहतुकीवर ‘पीएमपी’च्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले आहे. मुख्यालयात बसून असणाऱ्या विभाग प्रमुखांना आगारात पालक अधिकारी म्हणून पाठविण्यात आले. तर बंद पडणाऱ्या बस, रद्द होणारे मार्ग यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कामात कुचराई करणाऱ्या सुमारे २५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.