PMP Bus : पीएमपीचे निघाले दिवाळे; संचलनातील तूट गेली ७६६ कोटीवर

कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचे भाडे, वाढणारा विद्युत खर्च यामुळे पीएमपीच्या खर्चात बेसुमार वाढ होत आहे.
pmp bus
PMP BusSakal
Updated on

पुणे - कर्मचाऱ्यांचे वेतन, बसचे भाडे, वाढणारा विद्युत खर्च यामुळे पीएमपीच्या खर्चात बेसुमार वाढ होत आहे. मात्र, त्यात पीएमपी बसची वर्षभरात तब्बल १३.०५ लाख किलोमीटर एवढी बिगर प्रवासी वाहतूक (डेड किलोमीटर) झालेली आहे. त्यामुळे तोटा २४ कोटी ६८ लाखाने वाढला आहे.

संचलनातील एकूण तूट ७६६ कोटी रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे पीएमपीचा पाय आणखी खोलात गेला आहे. पुणे महापालिकेचे मुख्य लेखापरिक्षक जितेंद्र कोंळबे यांनी २०२३-२४ या वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्यात या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीला संचलनातील तुटीच्या अनुक्रमे ६० आणि ४० टक्के इतकी रक्कम दिली जात आहे. पीएमपीचा तोटा गेल्या ११ वर्षात ९९ कोटी रुपयांवरून ७६६ कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. याचा सर्वाधिक भार पुणे महापालिकेला उचलावा लागत आहे.

२०२३-२४ या वर्षात पीएमपीच्या बसेसनी सुमारे १२.१७ कोटी उत्पादित किलोमीटरची धाव पूर्ण केली आहे. तर बिगर प्रवासी वाहतूक ही १३.०५ किलोमीटर आहे. तर चालक व वाहनांसाठी केलेली वाहतूक ही ८.५४ किलोमीटर इतकी आहे. या वर्षभरात एकूण १२.३९ कोटी किलोमीटर पीएमपीच्या बसेसने प्रवास केला आहे.

पीएमपीला प्रती किलोमीटरसाठी ११४.२४ रुपये इतका खर्च येतो. पण प्रती किलोमीटर उत्पन्न हे केवळ ५३.२८ रुपये इतके आहे. तर तोटा हा प्रती किलोमीटर ६०.९६ रुपये इतका आहे. प्रती किलोमीटर खर्च आणि उत्पन्न यातील तफावत वाढत जात असल्याने संचलनातील तूट वाढत आहे. २०२२-२३ या वर्षात संचलनातील तूट ही ७२६.७८ कोटी इतकी होती, ती २०२३-२४ या एका वर्षात तब्बल ४० कोटी रुपयांनी वाढली आहे.

बस सेवेतून, जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त आहे. पीएमपीमध्ये अकरा हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. इंधनाचे, विद्युत पुरवठ्याचे दरही वाढले आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यात खासगी ठेकेदारांच्या गाड्यांना भाडे द्यावे लागते. अनेक मार्ग तोट्यात चालत असल्याने पीएमपीचा तोटा दरवर्षी वाढत आहे, असे लेखापरिक्षण अहवालात नमूद केले आहे.

तूट वाढण्याचे प्रमुख कारणे

- तिकीट, पास दरवाढ नाही.

- तिकीट विक्री व पास उत्पन्नामध्ये घट

- पीएमपीचे तिकीट तपासणीची भरारी पथके सक्षम नाहीत

- उत्पन्न, खर्च, उत्पादित धाव, स्थायी खर्चामध्ये कोणतीही बचत नाही.

- सेवकांच्या वेतन वाढीमुळे खर्चात मोठी वाढ

- बिगर प्रवासी वाहतुकीमुळे २४.६८ कोटीचा तोटा

- जुन्या बस सतत बंद पडत असल्याने उत्पादन घटले

तूट कमी करण्यासाठी उपाययोजना

- पीएमपीच्या खर्चावर मर्यादा आणणे, बचतीचे प्रमाण वाढवणे

- तपासणी पथकांचे सक्षमीकरण करणे.

- तिकीट व पास दराचा अभ्यास करून यात सुधारणा करणे गरजेचे.

- बिगर प्रवासी वाहतूक कमी करणे.

- जास्तीत जास्त बसेस संचलनात आणणे

- वारंवार बंद पडणाऱ्या बसेस दुरुस्त करणे

- पीएमपीच्या मालमत्तांचा उत्पन्नासाठी व्यावसायीक वापर करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com