

PMPML Financial Crisis
esakal
पुणे: पुणेकरांची जीवनवाहिनी असलेली ‘पीएमपीएमएल’ सध्या खडतर आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत ‘प्रवास’ करीत आहे. महामंडळाचा एकूण खर्च हा उत्पन्नाच्या जवळपास दुप्पट झाला आहे. शिवाय, १५ जुलै २०२६ अखेर महामंडळाच्या डोक्यावर तब्बल २९९.८४ कोटी रुपयांच्या थकबाकीची टांगती तलवार असून, पीएमपीचा गाडा खऱ्या अर्थाने ‘उधारी’वर हाकला जात आहे.