Warje Traffic: पीएमपीच्या अस्ताव्यस्त पार्किंगचा ‘फटका’; गणपती माथा परिसरात वाहतुकीला अडथळा, वारजे, शिवण्यातील सेवेवर परिणाम

PMP Parking Issue: वारजेतील गणपती माथा परिसरात पीएमपी बसच्या दुहेरी-तिहेरी पार्किंगमुळे तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या २० ते २५ बसांमुळे शिवणे, उत्तमनगर व कोंडवे धावडे भागातील प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.
Warje Traffic

Warje Traffic

sakal

Updated on

वारजे : येथील गणपती माथा परिसरात पीएमपी बसच्या अस्ताव्यस्त आणि दुहेरी-तिहेरी पार्किंगमुळे दररोज गंभीर वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरच २० ते २५ बस उभ्या राहत असल्याने अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापला जात आहे. परिणामी, शिवणे, उत्तमनगर, कोंडवे धावडे आणि कोपरे या भागांतून शहरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com