

Atharva Sudame
esakal
पुणे: सार्वजनिक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) एका रीलस्टारला कडक नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात अथर्व सुदामेला लक्ष्य करण्यात आले असून, महामंडळाच्या बससेवेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे महिलांच्या सन्मानाला धक्का बसल्याचेही महामंडळाने नमूद केले आहे.