

PMPML Modern Bus Stops
esakal
पुणे: पुणेकरांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि हायटेक होणार आहे. पीएमपी प्रशासनाने ‘बीओटी’ (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर शहरातील बस थांब्यांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात ६८५ थांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन आणि मोबाईल चार्जिंगसारख्या आधुनिक सुविधा मिळणार आहेत. सौरऊर्जेचा वापर आणि स्टेनलेस स्टीलच्या देखण्या संरचनेसह हे बस थांबे उभारले जाणार असून, यात पुण्यातील ३३९, तर पिंपरी-चिंचवडमधील ३४६ बस थांब्यांचा समावेश आहे.