
पुणे : पीएमपीच्या अध्यक्षपदी पंकज देवरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत. तर मावळत्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती समाज कल्याण विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली. त्यांनी शुक्रवारी आपला पीएमपीचा पदभार सोडला.