PMPML Bus: पुण्यात बसमध्ये आता 'गुगल पे', 'फोन पे' नं तिकीट काढता येणार; पीएमपी प्रशासनाचा मोठा निर्णय

पीएमपीएमएलनं हा महत्वाचा निर्णय घेतला असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
PMPML Bus Google Pay Phone Pe
PMPML Bus Google Pay Phone Pe

पुणे शहर वाहतूक व्यवस्थेतील कणा असलेल्या पीएमपीएमएल बसचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. कारण प्रवाशांना आणि कंडक्टरना नेहमी सुट्ट्या पैशांसाठी बसमध्ये वाद घालावे लागत होते, हे वाद आता बंद होणार आहेत. कारण यावर उपाय म्हणून गुगल पे, फोन पे द्वारे तिकीट काढण्याची सुविधा लवकरच बसमध्ये सुरु होणार आहे. (PMPML Pune bus tickets can now be purchased using online payment like Google Pay Phone Pay)

सर्वत्र होतोय वापर

गुगल पे, फोन पे असे ऑनलाई पेमेंटचे पर्याय आता व्यवहारात सर्वत्र वापरले जात आहेत. चहाच्या टपरीपासून भाजी मार्केटपासून सराफा दुकानांपर्यंत सर्व किरकोळ ते बड्या व्यवहारांसाठी ऑनलाईन पेमेंटचा वापर केला जात आहे. फक्त हा पर्याय बस प्रवासादरम्यानच वापरता येत नव्हता. पण आता पुणेकरांसाठी ही महत्वाची सुविधाही सुरु होत आहे.

पीएमपीएमएलनं हा महत्वाचा निर्णय घेतला असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com