
पुणे : ‘पीएमपी’ प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या मार्गांचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. सध्या ४०२ मार्गांवर ‘पीएमपी’ बस धावत असून, त्याद्वारे सुमारे ११ लाख प्रवाशांची दैनंदिन वाहतूक होत आहे. शहर व उपनगरातील प्रवाशांची गरज लक्षात घेता ‘पीएमपी’ प्रशासनाने आपल्या मार्गाच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाने केलेल्या सर्वेनुसार १५ नवे मार्ग अस्तित्वात येत असून, आठवड्यात या नवीन मार्गांवर सेवा सुरू होणार आहे.