PMPML Bus : बसथांब्यांची माहिती डिजिटल स्वरूपात; ‘पीएमपी’मध्येच माहिती देण्याची यंत्रणा
Digital Bus System : पुण्यातील पीएमपी बसमध्ये आता प्रत्येक थांब्याची माहिती डिजिटल फलक व घोषणांद्वारे दिली जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवास अधिक सोयीस्कर, अचूक व प्रवाशांना वेळेची माहिती मिळणार आहे.
पुणे : ‘पीएमपी’बसमधील प्रवाशांना पुढचा थांबा कोणता हे जाणण्यासाठी खिडकीतून डोकावण्याची गरज भासणार नाही. त्याबाबत तसेच इतर आवश्यक माहिती बसमध्येच देण्यासाठी येत्या एक ते दीड महिन्यांत प्रणाली कार्यान्वित होईल.