उन्हाळ्यात घामाघूम, पावसात गेले भिजून!

पीएमपी प्रवासी त्रस्त : पुण्यात तब्बल ३०० बसथांबे शेडविना; प्रशासनाचे दुर्लक्ष
PMPML Travel 300 bus stands in Pune are without sheds Neglect administration pune
PMPML Travel 300 bus stands in Pune are without sheds Neglect administration punesakal
Updated on

- प्रसाद कानडे

पुणे : पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेली पीएमपी आपल्या प्रवाशांना प्राथमिक सुविधा देण्यात कुचकामी ठरत आहे. शहरात सुमारे ३०० ठिकाणी बसथांबा (शेल्टर) नसल्याने रोज लाखभर प्रवाशांना पावसात भिजून प्रवास करावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पीएमपीने बसथांब्यासाठी आता पुन्हा एकदा ‘बीओटी’कडे नजरा लावल्या आहेत. उन्हाळ्यात पुणेकरांनी घाम पुसत प्रवास केला, आता पावसाळ्यात त्यांना पावसाच्या पाण्यात भिजून प्रवास करावा लागत आहे.

‘पीएमपी’ बसमधून रोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करतात. यासाठी पुणे व पिंपरीच्या परिसरात १२०० बसथांबे उभारले आहे. ११ लाख प्रवाशांकरिता हे पुरेसे नाहीत. तसेच या १२०० बसथांब्यांपैकी सुमारे ३०० थांबे हे नादुरुस्त आहेत तर काही ठिकाणी थांब्याचे छतच नाही. तर शहरांतील काही ठिकाणी केवळ बस थांबते म्हणून बसथांबा आहे. प्रवाशांचे ऊन व पावसापासून बचावासाठी काहीच नाही. एक बस थांब्यासाठी सुमारे ३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो खर्च करण्यात पीएमपीला स्वारस्य नसल्याने पीएमपीने बस थांब्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी रोज सुमारे एक लाख प्रवाशांना याचा थेट बसत आहे.

येथे आहे दयनीय अवस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील बसथांब्याची दयनीय अवस्था आहे. या ठिकाणी गर्दुल्यांचा मुक्त वावर आहे, तर स्वारगेट बसडेपोचे छत पडले आहे. स्वा. सावरकर अध्ययन केंद्र येथील बसथांब्यावरील पत्रे निघालेले आहेत. अशीच परिस्थिती विठ्ठलवाडीच्या थांब्याची आहे.

‘नको देवराया अंत आता पाहू’

पीएमपी बसथांब्यांची अवस्था पाहून ‘नको देवराया अंत आता पाहू’... असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. उन्हाळ्यात बसची वाट बघत घामाघून व्हायची वेळ आली होती आणि आता पावसाळ्यात भिजत थांबायची वेळ आली आहे. प्रशासनातील संबंधित अधिकारी गांभीर्याने याकडे कधी बघणार हा प्रश्‍न आहे. याबाबत प्रवासी म्हणून आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

पीएमपीने काही ठिकाणी गरज नसताना बसथांब्याची दुरुस्ती केली, तर ज्या ठिकाणी गरजेचे आहे तिथे मात्र बसथांबाच नाही. प्रवाशांना उन्हात व पावसात उभे राहावे लागते.

- नीलकंठ मांढरे, प्रवासी

मी रोज कर्वेनगरहून येथे कामासाठी येते. येथून घरी जाताना मात्र त्रास होतो. येथे बसथांबाच नाही. ना बसायला जागा, ना उभे राहण्यास आसरा आहे. बसशेड उभारणे गरजेचे आहे.

- इंदू पंडित, प्रवासी

काही बसथांब्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. ३०० ठिकाणी बसथांबे होणे गरजेचे आहे. अभियांत्रिकी विभाग याबाबत काम करीत आहे.

- दत्तात्रेय झेंडे,वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com